मुंबई : विक्रोळी पूर्व पश्चिमेला जोडणारा वाहतूक पूल आता सुरू झाला आहे, प्रवाशांसाठी सार्वजनिक वाहतूक अधिक सुकर होण्यासाठी या पुलावरून बेस्ट बसची वाहतूक सुरू करा, अशी मागणी जनता दल विक्रोळी तालुकाने केली आहे.
या पुलावरून बेस्ट बस वाहतूक सुरु केल्यास थेट लालबहादूर शास्त्री मार्गावर पोहोचता येईल. बेस्ट प्रशासनाने याबाबत सर्वेक्षण करून निर्णय घ्यावा, अशी मागणी जनता दलाचे ऍड. प्रशांत गायकवाड, विक्रोळी तालुकाअध्यक्ष यतीन तोंडवळकर, कन्नमवार नगर प्रभाग अध्यक्ष भूषण भिसे, नितीन अडकर, प्रफुल्ल रणदिवे, विवेक कांबळे यांनी केली आहे.
बेस्टने या पुलावरून वाहतूक सुरू केल्यास पूर्व उपनगरातील पश्चिमेकडील भागात प्रवाशांना थेट जाता येईल, याबाबत लवकरच पत्रव्यवहार करण्यात येणार आहे. दरम्यान, विक्रोळी पूर्व पश्चिमेला जोडणारा वाहतूक पूल सुरू झाल्याने लाखो नागरिकांना दिलासा मिळाला आहे. या पुलामुळे वाहतुकीस चालना मिळाली आहे.
Social Plugin