मुंबई : भांडुप मध्ये जनता दल सेक्युलर कडून 10 ऑगस्ट 2025 रोजी क्रिकेट सामने खेळवण्यात येणार असून जनता दल चषक 2025 चे आयोजन करण्यात आले आहे. पक्षाचे ईशान्य मुंबई जिल्हाध्यक्ष लोकप्रिय नेते श्री. संजीवकुमार सदानंदन, पक्षाच्या नेत्या श्रीमती प्रियाताई संजीवकुमार यांनी सदर क्रिकेट सामने भरविले आहेत. भांडुप पश्चिम येथील वी 4 स्पोर्ट्स अरेना, उषा कॉम्प्लेक्स, सोसायटी रोड, भांडुप व्हिलेज रोड, भांडूप पश्चिम येथे क्रिकेट सामने होतील.चषक, प्रथम पारितोषिक ५० हजार रुपये, द्वितीय २५ हजार अशी रक्कम ठेवण्यात आली आहे.
भांडुप मध्ये नेते संजीवकुमार सदानंदन यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे संघटन उत्कृष्ट सामाजिक कार्य करत असून तेथे नेहमीच विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
क्रिकेट सामन्यांच्या अधिक माहितीसाठी अक्षय शिरसाठ 9987810287 आणि अक्षय शेट्टी 9769335539 यांच्याशी संपर्क साधावा, अशी माहिती भांडुप तालुकाध्यक्ष श्री. शुभम पवार यांनी दिली.
Social Plugin